in

Petrol Rate Price | इंधन झालं स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

इंधनाच्या दरात या आठवड्यात तिसऱ्यांदा किंचीत घट झाली आहे. आज पेट्रोलच्या दरात प्रति लीटर 22 पैसे ते डिझेल मध्ये प्रतिलिटर 23 पैसे इतकी घट झाली आहे. या नवीन दरांनुसार दिल्लीत पेट्रोलचा दर आता 90 रूपये 56 पैसे तर डिझेलचा दर 80 रुपये 87 पैसे इतका झाला आहे. मुंबईतील पेट्रोलचा दर 96 रुपये 98 पैसे इतका झाला असून डिझेलचा दर 87 रुपये 96 पैसे इतका झाला आहे.

देशात गेले सहा महिने सतत इंधनाचे दर वाढत असून मार्च मध्ये प्रथमच इंधनाचे दर घटताना दिसत आहेत. सध्या पाच राज्यांत निवडणुका आहेत. निवडणुकांच्या काळात इंधनाचे दर वाढवायचे नाहींत असेच धोरण केंद्र सरकारने आत्तापर्यंत बाळगले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट ज्या बैठकीत रचण्यात आला, तिथे वाझेही उपस्थित

‘लॉकडाउन करण्याआधी रोजगाराचे पैसे बँक खात्यात जमा करा’