in

Phone Tapping Case | रश्मी शुक्ला यांना मुंबई सायबर पोलिसांनी बजावला समन्स

फोन टॅपिंग प्रकरणीसनदी अधिकारी रश्मी शुक्ला यांना मुंबई सायबर पोलिसांनी समन्स बजावला आहे. फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांचा बुधवारी जबाब नोंदवला जाणार आहे. रश्मी शुक्ला यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी हे समन्स पाठवण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुप्तचर विभागाच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या टॉप सिक्रेट कागदपत्रांचा दाखला देत, महाराष्ट्रातील पोलिसांच्या बदलीचे रॅकेट उघडकीस आणले होते. फडणवीस यांनी असा आरोप केला होता की, काही एजंट्स आणि राजकीय नेत्यांच्या मदतीने अनेक पोलीस अधिकारी इच्छित पोस्टिंग मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. 25 ऑगस्ट 2020 रोजी तत्कालीन गुप्तचर आयुक्त रश्मी शुक्ला यांनी एका गुप्त माहितीच्या आधारे अतिरिक्त मुख्य सचिव गृह यांच्याकडून परवानगी घेतल्यानंतर काही फोन टॅप केले होते, ज्यात अनेक खळबळजनक गोष्टी उघडकीस आल्या होत्या.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

बीडच्या अंबाजोगाईतील धक्कादायक प्रकार; एकाच रुग्णवाहिकेतून 22 मृतदेहांची वाहतूक

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला कोरोनाची लागण