in

वारकऱ्यांच्या दिंडीत घुसली पिकअप गाडी; 5 जणांचा जागीच मृत्यू

आळंदीकडे चाललेल्या पायी दिंडीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. मुंबईकडून भरधाव वेगाने येत असलेल्या पिकअप गाडीने अचानक पायी चालत असलेल्या दिंडीत घुसली आणि मोठा अपघात झाला. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला असून २५ जण गंभीर जखमी आहे.

मंगळवारी असलेल्या आळंदीतील यात्रेसाठी खालापूर तालुक्यातील उंबरे, बीड, खालापूर, खोपोली, कर्जत गावातून माऊली कृपा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री संत ज्ञानेश्वर महाराज पायी दिंडी सुरू होती. शनिवार, २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ही दिंडी मार्गस्थ होऊन ब्राह्मणवाडी येथे चहा, नाश्त्यासाठी निघाले असताना भीषण अपघात घडला. कान्हे फाट्याजवळ मुंबईकडून भरधाव वेगात असलेल्या पिकअप गाडी अचानक या पायी असलेल्या दिंडीत घुसली या अपघाताने अनेकजण रस्त्यावरच कोसळले. यावेळी स्थानिकांनी तातडीने जखमींना कामशेत येथील बढे हॉस्पिटल, कान्हे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना केले. तिथे अपघातग्रस्तांवर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले.

मात्र या भीषण अपघातात सविता येरम (उंबरे), सुरेखा चोरघे (बीड), संगीता शिंदे (सखोळ) आणि जयश्री पवार (भूतवली) या चार महिलांचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. अपघातात पोलिस अधिकाऱ्यांनी पिकअप वाहनाच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल करून , त्याला ताब्यात घेतले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘हे सरकार म्हणजे पुत्र, पुत्री आणि पुतण्या यांचं सरकार’

‘सौ दर्द छुपे है सीने मे…छगन भुजबळांची शायरीमधून टीका