in

PNB Scam | नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा

PNB बँकचा १३ हजार ६०० कोटी रुपयांचा घोटाळा करून फरार झालेला नीरव मोदी यांच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. युकेच्या गृहमंत्र्यांनी नीरव मोदी यांच्या प्रत्यार्पणास मान्यता दिली आहे. अशी माहिती सीबीआय अधिकाऱ्यानी दिली आहे. त्यामुळे लवकरच नीरव मोदी भारताच्या ताब्यात येणार आहे.

नीरव मोदीला भारताकडे सुपूर्द करण्याबाबत लंडनच्या वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टाने 25 फेब्रुवारी रोजी निर्णय दिला होता. या निर्णयानंतर नीरव मोदीला भारताकडे सुपूर्द करण्याचा मार्ग कोर्टाने मोकळा केला होता. त्यानुसार आता आज युनायटेड किंगडमच्या गृहमंत्र्यांनी नीरव मोदीला भारताकडे सुपूर्द करण्याला मंजूरी दिली आहे. याबाबतची माहिती भारतातील CBI च्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पंजाब नॅशनल बँकेतील काही अधिकाऱ्यांच्या मदतीने तब्बल १३ हजार ६०० कोटी रुपयांचा घोटाळा करून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदीला भारतात पाठवले जाईल, हे अलीकडेच नक्की झाले होते. ब्रिटनच्या न्यायालयामध्ये प्रत्यार्पण खटल्यात मोदींच्या हाती अपयश आले होते. त्याच्यावरील आर्थिक घोटाळा आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपात तथ्य आहे, असेही न्यायालयाने म्हटले होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

संजय राठोडांच्या राजीनाम्यानंतर पालकमंत्रीपदी ‘या’ मंत्र्याची वर्णी

आमदार निधीतून कोरोना खर्चासाठी 350 कोटी निधी देणार- अजित पवार