in

बलात्कार करून रेल्वेने पळून जाणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी केली अटक

परराज्यात बलात्काराचा गुन्हा करून रेल्वेने पळून जाणाऱ्या तीन आरोपींना पकडण्यात गोंदिया रेल्वे पोलिसांना यश आले आहे. झारखंड राज्यातील देवीपूर पोलिसांनी त्याच्या कोटठितील तीन आरोपी हावड़ा – अहमदाबाद एक्सप्रेस ने टाटानगर येथून सूरत गुजरातकडे पळून जात असल्याची माहिती फोनद्वारे गोंदिया रेल्वे पोलिसांना दिली.

गाडी गोंदिया रेल्वेस्टेशनवर फलाट क्रमांक 3 वर येताच गोंदिया रेल्वे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु करत त्यांना  ताब्यात घेतले. राजेश मंडल वय 21 वर्ष, राधेश्याम मंडल वय 24 वर्ष व विजय मंडल वय 20 वर्ष असे अटक करण्यात आलेल्या आरोपी चे नाव असून सर्व राहणार पोलिस स्टेशन देवीपुर(झारखंड)हद्दीतील सिरी गावातील आहेत. आता त्यांना झारखंड पोलिसांकडे सुपूर्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Uttarpradesh| बस-टेम्पोच्या भीषण अपघातात १७ जणांचा मृत्यू; मोदी-योगींकडून मदत जाहीर

संजय राऊत आजपासून उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर; संघटना वाढीसाठी प्रयत्न