नागपूर अमरावती महामार्गावर मुबंई कडून भंडाराकडे जाणाऱ्या पोलीस वाहनाचा टायर फुटल्याने अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन दुसऱ्या बाजूने पलटी झाले. यात वाहनातील आरोपीचा घटनास्थळी मृत्यू झाला तर तीन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहे. अपघातातील मृतक हा गेल्या काही वर्षात झालेल्या अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या 358 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपी असल्याची माहिती आहे.
चालकाचे पोलीस वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहनाने रस्ता ओलांडून जवळपास तीन चार पलट्या घेतल्या. यात वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन उभे राहिले. यात आरोपी श्रावण कृष्णा बावणे याचा जागीच मृत्यू झाला. तर तीन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहे. तिन्ही पोलिसांवर कारंजा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर या अपघातात मृत्यू झालेला आरोपी हा अण्णाभाऊ साठे महामंडळ मध्ये काही वर्षांपूर्वी 385 कोटींचा घोटाळा झाला होता त्यातील सहआरोपी असल्याचे सांगण्यात आले आहे.
Comments
Loading…