in

केंद्राची मोठी घोषणा; गरिबांना मिळणार 5 किलो मोफत धान्य

देशात कोरोनाच्या संसर्गामुळे गरिबांचे अतोनात हाल झाले आहेत. तसेच लॉकडाऊन रोजगारही बुडाल्याने दोन वेळच्या जेवणाची पंचाईत झाली आहे. त्यामुळे गरीब जनतेची हेळसांड होऊ नये म्हणून पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मे आणि जून महिन्यात ५ किलो मोफत धान्य देण्याचा निर्णय निर्णय घेण्यात आला आहे.

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मे आणि जून महिन्यात ५ किलो मोफत धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेचा ८० कोटी नागरिकांना फायदा होणार आहे. या निर्णयामुळे गरीब जनतेला दिलासा मिळणार आहे. या योजनेवर केंद्र सरकार २६ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.

दरम्यान नोव्हेंबर २०२० पासून केंद्र शासनानं पंतप्रधान गरीब कल्याण योजना बंद केली होती. आता लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना पुन्हा राबवल्यानं गरीब आणि गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आईसाठी ऑक्सिजन मागणाऱ्या तरुणाला कानाखाली मारण्याची भाजपा खासदाराची भाषा

‘लोक मरताहेत’; सुप्रीम कोर्टाचे पुन्हा ताषेरे