in

ममता बॅनर्जींच्या विजयानंतर ‘या’ व्यक्तीचा राजकारणाला रामराम

राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी मोठी घोषणा केली आहे. निवडणूक रणनीती बनविण्याचं काम मी सोडणार असल्याचे मोठे विधान किशोर यांनी केले आहे. वृत्त वाहिन्यांशी बोलताना त्यांनी हि प्रतिक्रिया दिली.

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि तामिळनाडूत डीएमके नेते स्टॅलिन सत्तेत आले आहेत. या दोन्ही नेत्यांना सत्तेत आणण्यासाठी राजकीय चाणक्य प्रशांत किशोरचा डावपेच आखले होते. हे डावपेच यशस्वी झाल्यानंतर प्रशांत किशोर यांनी मोठी घोषणा केली आहे. प्रशांत किशोर यांनी आता निवडणूक रणनीती बनविण्याचं काम मी सोडणार आहे, असं त्यांनी सांगितलं. मात्र, पुढे काय करणार हे मात्र त्यांनी स्पष्ट केलं नाही.

ट्विट

भाजप 100 जागा जिंकल्यास मी राजकीय रणनीती करणं सोडून देईल, असं आव्हानच प्रशांत किशोर यांनी दिलं होतं. तसं ट्विटच त्यांनी केलं होतं. मीडियाने कितीही गवगवा केला तरी बंगालमध्ये भाजपच दोन अंकी आकडाही गाठणार नाही. हे ट्विट सेव्ह करून ठेवा. भाजपने यापेक्षा चांगली कामगिरी केली तर मी निवडणूक डावपेच आखण्याचं कामच सोडून देईल, असं ते म्हणाले होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

RR Vs SRH | सनरायजर्स हैदराबादचा गोलंदाजीचा निर्णय

ममतांनी बंगाल जिंकलं, मात्र नंदीग्रामचा ‘अधिकारी’ कोण ?