लोकशाही न्यूज नेटवर्क

संसदेच्या कॅन्टीनमधील अन्नपदार्थांचे दर वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे आता अधिक पैसे खर्च करून लोकप्रतिनिधिकांना खाण्याचा आस्वाद घ्यावा लागणार आहे. लोकसभा सचिवालयाने नवीन दर यादी जाहीर केली आहे, ज्यात 3 रुपयांपासून ते 700 रुपयांपर्यंतच्या खाद्यपदार्थांचा समावेश आहे. ही नवीन दरवाढ 29 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधीच जारी करण्यात येणार आहे.

संसद भवनच्या कॅन्टीनमधील नवीन दर यादीनुसार, सर्वस्त स्वस्त भाजीची किंमत 3 रुपये असणार आहे. तसेच नॉन- बुफे लंच हे सर्वात महाग असेल, ज्याची किंमत 700 रुपये असेल. याव्यतिरिक्त व्हेज-बुफे लंचची किंमत 500 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

जुन्या मेन्यू कार्डमध्ये एक चपातीचे किंमत 2 रुपये आणि हैदराबादी चिकन बिर्याणीची किंमत 65 रुपये इतकी होती, तसेच आधीच्या दरानुसार 6 रुपयात बटाटा वाडा, तर डोसा 10 रुपयांना उपलब्ध होता. मात्र आता नवीन दर लागू झाल्याने याची किंमत वाढणार आहे.