in

पहिली ते आठवीच्या मुलांना थेट पुढच्या वर्षात प्रवेश ; शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा

पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलांना विना परीक्षा पुढच्या वर्गात थट प्रवेश दिला जाणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्याचे जाहीर केले आहे.

त्यामुळे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. त्यानुसार राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. ट्विटरवर व्हिडिओ शेअर करून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Pune mini lockdown : खासदार गिरीश बापट यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांना पोलीसांनी घेतले ताब्यात

Sachin Vaze Controversy: सुनावणी संपली… सचिन वाझेच्या कोठडीत वाढ!