in ,

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विशेष फोन

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा सामना करत असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना मुंबईतील गिरगावमधील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी रश्मी ठाकरे यांना रुटीन तपासणीसाठी रुग्णालयात आणण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. मात्र त्यानंतर रश्मी ठाकरेंना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती दिली जात आहे. गेले आठ दिवस त्यांना खोकला येत होता. त्यामुळे त्यांना मंगळवारी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती, सध्या रश्मी ठाकरेंवर रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करून रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. त्याचसोबत त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

रश्मी ठाकरे यांनी ११ मार्च रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोरोनाची लस घेतली होती. मात्र त्यानंतर त्यांना कोरोनाचा संर्ग झाला होता. सुरुवातीला वर्षा निवासस्थानी क्वारेंटाइन राहिल्यानंतर रश्मी ठाकरे यांना अधिक उपचारांसाठी रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘रजनी अण्णा’ यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

‘ममता नावाची वाघीण सर्वांना पुरून उरेल’