in ,

पंतप्रधान अमेरिकेत; असा असेल कार्यक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज अमेरिकेच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाले. अमेरिकेशी व्यापार आणि सामरिक भागिदारीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या दौऱ्यामध्ये मोदी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यासह क्वाड मधील सहकारी जपानचे पंतप्रधान आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान यांना भेटणार आहेत. याशिवाय संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेतही मोदींचे भाषण होणार आहे.

वॉशिंग्टनमध्ये पंतप्रधान मोदी यांचं जोरदार स्वागत झाल्याचं पाहायला मिळालं. विमानतळावर पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यासाठी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अनेक अधिकारी पोहोचले होते. अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधूही विमानतळावर उपस्थित होते. पंतप्रधान मोदींच्या आगमनाच्या आनंदात भारतीय समुदायातील 100 हून अधिक लोक विमानतळावर पोहोचले होते.

मोदींनीही ट्विट करून वॉशिंग्टनमध्ये पोहोचल्याची माहिती दिली. त्यांनी लिहिलं, ‘वॉशिंग्टन डीसीला पोहोचलो. पुढील दोन दिवसात मी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस, स्कॉट मॉरिसन, योशीहिदे सुगा यांना भेटणार आहे.

या काळात मी क्वाड मीटिंगमध्ये भाग घेईन आणि टॉप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटेन आणि भारतातील आर्थिक कामगिरी त्यांच्यासमोर मांडेल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

IPL 2021, DC vs SRH| राजधानी एक्स्प्रेस सुपर फास्ट

…तर तुमची धोतरे पेटतील हे विसरु नका, सामनातून राज्यपालांना इशारा