in

”पंतप्रधानांनी दाढी करावी”…चहावाल्यानं केली १०० रुपयांची मनीऑर्डर…

रुपेश होले | बारामती शहरातील एका चहा विक्रेत्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शंभर रुपयांची मनीऑर्डर केली आहे. पंतप्रधानांनी दाढी करावी यासाठी अनिल मोरे यांनी मनीऑर्डर केली आहे. अनिल मोरे या मनीऑर्डर सोबत एक पत्र पाठवले असून त्यात काही मागण्या पंतप्रधानांना केल्या आहेत. या मनीऑर्डरची सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे.

‘पंतप्रधान मोदी दाढी वाढवून फिरत आहेत, जर त्यांना काहीतरी वाढवायचे असेल तर लोकांसाठी रोजगार वाढवावा. लोकांसाठी आरोग्य सुविधासह लसीकरण केंद्र वाढवावे.’ अशी मागणी त्यांनी मनीऑर्डर सोबत दिलेल्या पत्रात केली आहे.

मोरे यांचा बारामतीत चहाचा स्टॉल आहे. लाॅकडाऊनमुळे त्यांना आर्थिकदृष्टा तोटा झाल्यानं यातून लक्ष वेधून मदत मिळावी यासाठी ही मनीऑर्डर त्यांनी केली आहे. याशिवाय ‘पंतप्रधान हे देशाचे सर्वोच्च नेते आहेत. आमचा त्यांच्याबद्दल आदर आहे, त्यांना त्रास देण्याचा आमचा हेतू नाही.’ असंही त्यांनी आवर्जून सांगितलं आहे. गेल्या दीड वर्षापासून कोरोना साथीच्या आजारात ज्या प्रकारे लोकांच्या समस्या वाढत आहेत. त्यामुळे लोकांसाठी आरोग्या सुविधासह रोजगार वाढवावा अशी अपेक्षा मोरे यांनी पंतप्रधानांनकडे पत्राद्वारे केली आहे.

दरम्यान आता बारामतीतल्या मोरे चहावाल्याच्या मागणीवरून पंतप्रधान दाढी करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Tokyo Olympic | पॅरा बॅडमिंटनपटू कृष्णा नागरनं मिळवलं ऑलिम्पिकचं तिकिट!

एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा; राज्य सरकार महामंडळाला ६०० कोटी देणार