in

‘लॉकडाउन करण्याआधी रोजगाराचे पैसे बँक खात्यात जमा करा’

लॉकडाऊन कोणालाही आवडत नाही. पण तहान लागल्यावर विहीर खणायची नाही. त्यामुळेच लॉकडाऊनची पूर्वतयारी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, आता काँग्रेसनंही लॉकडाऊनला थेट विरोध दर्शवला आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी लॉकडाउनला विरोध करत काही मागण्या केल्या आहेत. त्यांनी यासंदर्भात टि्वट करून राज्य सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत.

  • लॉकडाऊन करण्यापूर्वी सर्वसामान्य जनतेला पूर्वसूचना द्या
  • लॉकडाऊनचा कालावधी कमीत कमी ठेवावा.
  • बुडणाऱ्या रोजगाराची सरकारने भरपाई द्यावी, ती रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावी. त्यासाठी, आमदार व खासदार यांच्या स्थानिक निधीचा वापर करावा.
  • खासगी वाहनातून प्रवासास मुभा द्यावी.
  • शेतमाल व औद्योगिक मालाची वाहतूक चालू ठेऊन, पुरवठा साखळीवर परिणाम होऊ न देणे.
  • लसीकरणाचे प्रमाण मोठ्या संख्येनं वाढवणे.
    एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता काँग्रेसनंही लॉकडाउनसंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे लॉकडाउन करायच्या विचारात असलेलं राज्य सरकार काय निर्णय घेणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Petrol Rate Price | इंधन झालं स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

शिवसेना प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर; ‘या’ 16 जणांना मिळाली संधी