in

‘कोरोनापासून जनतेचे रक्षण कर’; सुधीर मुनगंटीवार यांचे बाप्पाकडे साकडे

अनिल ठाकरे | राज्याचे माजी अर्थमंत्री तथा विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवर यांनी आपल्या निवासस्थानी गणेश मूर्तीची स्थापना केली. यावेळी त्यांनी ‘कोरोना पासून जनतेचे रक्षण करण्यासोबतच बळीराज्याला समृध्द कर’ असे साकडे यानिमित्ताने विघ्नहर्ता गणराया मागितले आहे.

राज्याचे माजी अर्थमंत्री तथा विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवर यांनी पर्यावरण पूरक असलेल्या शाडू मातीच्या गणेश मूर्तीची आपल्या घरी आज स्थापना केली आहे. विशेष बाब म्हणजे, या मूर्तीची रंग रंगोटी स्वतः मुनगंटीवार यांनी केली. मी माझ्या घरच्या पर्यावरण पूरक शाडू मातीची गणेश मूर्ती’ला दरवर्षी रंग रांगोटी देत असतो, अशी माहिती लोकशाही न्यूजशी बोलतांना मुनगंटीवार म्हणाले. ‘कोरोना पासून जनतेचे रक्षण करण्यासोबतच बळीराज्याला समृध्द कर असे साकडे’ यानिमित्ताने विघ्नहर्ता गणराया पुढे केले असल्याचे आमदार मुनगंटीवार म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Roha Raigad

Manohar Bhosale | भोंदू मनोहरमामा उर्फ मनोहर भोसले पोलिसांच्या ताब्यात