in ,

Corona Update | पृथ्वीराज चव्हाणांनी ठाकरे सरकारकडे केल्या ‘या’ मागण्या

राज्यात लॉकडाऊन करायचा की नाही याबाबत सत्ताधाऱ्यांम काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं विधान केलं आहे. आधी रोजगाराचे पैसे थेट खात्यावर जमा करा, मग लॉकडाऊनचं बघा, असा सल्ला पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारला दिला आहे. तसेच चव्हाण यांनी ठाकरे सरकारकडे पाच मागण्याही केल्या आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रक काढून या मागण्या केल्या आहेत.

राज्यात कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. 2020मध्ये आढळून आलेल्या रुग्णसंख्येपेक्षा अधिक रुग्ण दरदिवशी राज्यात सापडत आहेत. विदर्भातील अमरावती आणि नागपूरपासून सुरू झालेली कोरोनाची ही दुसरी लाट मुंबई-पुण्यासह, मराठवाडा आणि राज्याच्या इतर भागात वेगाने पसरत आहे.

या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाउन करावे की कसे यावर प्रशासन, वैद्यकीय तज्ञ, उद्योग क्षेत्रातील व्यक्ती आणि सामान्य जनता यांमधून वेगवेगळे मतप्रवाह पुढे येत आहेत. महाराष्ट्रात उद्योजक असो किंवा वैद्यकीय तज्ञ प्रत्येकजण निडरपणे आपले मत मांडू शकतो ही आश्वासक बाब असली तरीदेखील शासनासमोर मात्र गंभीर पेचप्रसंग आहे. परिणामी राज्य पातळीवर लॉकडाऊनची अपरिहार्यता निर्माण झाल्यास खालील बाबी विचारात घेणे आवश्यक आहे, असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.

बेरोजगार, मजदूर, हातावर पोट असणारे आणि इतर असंघटीत
चव्हाण यांनी थेट लॉकडाऊन करण्यास विरोध केला आहे. त्यांनी बेरोजगार, मजदूर, हातावर पोट असणारे आणि इतर असंघटीत कामगारांच्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधलं आहे. आधी या घटकांना मदत करा, नंतरच लॉकडाऊनचा विचार करा, असा सल्लाही चव्हाण यांनी दिला आहे.

लसीकरणाचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढवा
केंद्र सरकारने गेल्या वर्षी मार्चमध्ये अचानकपणे कोणतेही नियोजन न करता लॉकडाऊन घोषित केला होता. त्यामुळे 3 कोटींहून अधिक लोक दारिद्र्य रेषेखाली ढकलले गेले. त्यामुळे जनतेला विश्वासात घेऊन अर्थव्यवस्थेचे कमीत-कमी नुकसान होईल आणि कोरोना संसर्गाची साखळी मोडण्यास मदत ठरेल अशा प्रकारे लॉकडाऊनचे नियोजन करणे आवश्यक आहे, असं सांगतानाच कोरोना लसीकरणाचे प्रमाण वाढवण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

West Bengal Assembly Elections 2021; माजी क्रिकेटर आणि भाजप उमेदवार अशोक डिंडावर जीवघेणा हल्ला

West Bengal Election : दुसऱ्या टप्प्यातील तोफा थंडावल्या… नंदीग्रामच्या उमेदवारांचे ‘देव पाण्यात’