in

Pune Lockdown Extended | पुण्यात 15 मेपर्यंत लॉकडाऊन कायम

पुण्यात वाढत असलेली कोरोना रुग्णसंख्या पाहता लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. येत्या 15 मे पर्यंत पुण्यात लॉकडाऊन कायम असणार असल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ट्विट करून लॉकडाऊन बाबत हि माहिती दिली आहे. पुण्यातील लॉकडाऊन 15 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. जिल्ह्यांतर्गत आणि जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी ई-पास काढावा लागणार आहे. आतापर्यंत 9 हजार ई-पास देण्यात आल्या आहेत. नितांत गरज असेल तरच प्रवास करा. अथवा घरातच राहा, असं ट्विट गुप्ता यांनी केलं आहे. त्यामुळे पुणेकरांना 15 मेपर्यंत सक्तीने कोरोना नियमांचं पालन करावं लागणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

”मुंबईत ३ दिवस लसीकरण बंद राहणार”

Maharashtra Lockdown Extended | राज्यात १५ मे पर्यंत लॉकडाउन वाढवला, पाहा नियमावली