in ,

पुणे महापालिकेकडून सुधारित नियमावली जाहीर; ‘या’ सेवा सुरू राहणार

पुणे महापालिकेने सुधारित नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीत आधीच्या आदेशानुसार अनेक अत्यावश्यक सेवा मध्ये मोडणाऱ्या सेवांना परवानगी देण्यात आली नव्हती.त्यामुळे कोणत्या सेवांना परवानगी दिली आहे व कोणत्या सेवांना डावलण्यात आले आहे, ते पाहुयात…

सुधारित नियमावली

  • पेट्रोल पंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने, कुरिअर सेवा, डेटा सेंटर, क्लाऊड सर्विस प्रोव्हायडर, माहिती-तंत्रज्ञान निगडित सेवा देणाऱ्या कंपन्या, सुरक्षा सेवा, फळ विक्रेते , नॉनव्हेजची दुकाने, पशुवैद्यकीय दवाखाने, पेट शॉप, पाळीव प्राणी संगोपन केंद्र यांचा अत्यावश्यक सेवेमध्ये समावेश.
  • सेबीची सर्व कार्यालय, रिझर्व बँकेची संबंधित संस्था, वित्तीय महामंडळे, कस्टम हाऊस एजंट औषधे औषधांची संबंधित वाहतूक करणारी परवानाधारक ट्रान्सपोर्ट ऑपरेटर, मायक्रो फायनान्स संस्था यांना सर्व दिवशी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळात त्यांची कार्यालय चालू ठेवता येणार आहेत.
  • अधिकृत तिकीट असलेल्या नागरिकांना घरातून स्थानकापर्यंत तसेच स्थानकापासून घरापर्यंत प्रवास करण्याची मुभा. याला वेळेचे कोणतेही बंधन नाही.
  • औद्योगिक कंपन्यांची खासगी बसेस आणि वाहने यांना संचार बंदीच्या काळात प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना ओळखपत्र बाळगणे बंधनकारक.
  • धार्मिक स्थळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी याठिकाणी पूजा-अर्चा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश असेल. तसेच विवाह किंवा अंत्यविधी कार्यक्रमास मर्यादित लोकांच्या उपस्थितीत परवानगी.
  • विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत जाण्याची मुभा नवीन नियमावली मध्ये देण्यात आलेली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना हॉल तिकीट बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी शिक्षकांना शाळा-कॉलेजमध्ये जाता येईल.
  • लग्नकार्यासाठी आता पोलिसांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक.
  • खाजगी वाहने आणि खासगी बसेस यांना सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळात परवानगी.
  • बांधकाम व्यावसायिकांना दिलासा. बांधकाम व्यावसायिकांचे साईट ऑफिस तसेच आर्किटेक्टचे ऑफिस आता सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत सुरु राहू शकेल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

दिलीप वळसे-पाटलांनी गृहमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अनिल देशमुखांचं ट्विट म्हणाले …

देशातील सर्वाधिक १० कोरोनाबाधित जिल्ह्यांपैकी ७ महाराष्ट्रात.. केंद्राने व्यक्त केली चिंता!