in

‘शेतकरीविरोधी कृषी कायदे रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हल्ल्याची शिकवण देतो, तर अहिंसात्मक सत्याग्रह शेतकऱ्यांना निर्भय बनवितो, असं प्रतिपादन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं आहे. आपण सर्व मिळून आरएसएसचा एकजुटीनं सामना करून तिन्ही कृषी कायदे रद्द करण्यास सरकारला भाग पाडू, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. राकेश टिकैत या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत. राजस्थानातील अल्वार जिल्ह्यात टिकैत यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली. यानंतर राहुल यांनी टि्वट करत शेतकऱ्यांसोबत असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान, टिकैत यांच्यावरील दगडफेकीप्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एका नेत्याला अटक करण्यात आली आहे.

‘संघ हल्ला करण्यास शिकवतो. अहिंसात्मक सत्याग्रह शेतकऱ्यांना निर्भय बनवतो. आम्ही संघाचा एकजुटीनं मुकाबला करू. शेतकरीविरोधी ३ कृषी कायदे रद्द केले जात नाहीत तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही’ असं टि्वट राहुल यांनी केलं आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

5व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमुळे दिलासा, पाहा आजचे दर

पंढरपूर पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी राजू शेट्टी पंढरीत