in

आता ‘जन की बात’ करा

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक लोक संकटात सापडले आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मान की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला . याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले आहे.

यंत्रणा कोलमडून पडल्या आहेत. आता जन की बात करा. या संकटात देशाला जबाबदार नागरिकांची गरज आहे. काँग्रेसच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनो सर्व राजकीय कामं सोडा आणि जनतेला मदत करा. कोणत्याही परिस्थितीत देशातील जनतेची दु:ख दूर करा. काँग्रेसचा हाच धर्म आहे, असं राहुल यांनी म्हटलं आहे. येणाऱ्या काळात हे संकट अधिक गंभीर रुप धारण करणार आहे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी देशाने सज्ज राहिलं पाहिजे. सध्याची परिस्थिती अत्यंत वेदनादायी आहे, असं राहुल म्हणाले होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

West Bengal Elections | तृणमूल काँग्रेसचे उमेदवार काजल सिन्हांचे कोरोनामुळे निधन

मे महिन्यात 9 दिवस बँका बंद