in

Assam Elections : भाजपा नेत्याच्या गाडीत EVM सापडल्यानंतर राहुल गांधींची सडकून टीका

आसाम निवडणुकांच्या दरम्यान भाजपा नेत्याच्या गाडीत काही ईव्हीएम सापडल्याने निवडणूक आयोगावर सडकून टीका होत आहे. याप्रकरणी सत्य समोर आल्यानंतर चार निवडणूक अधिकाऱ्यांचे निलंबन देखील झाले. मात्र, निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही टीका केलीय.

EC कि गाडी खराब, भाजपा कि नियत खराब, लोकतंत्र कि हालत खराब असे ट्विव राहुल गांधींनी केले आहे.

दरम्यान, गुरुवारी आसाममध्ये ३९ जागांसाठी मतदान झालं. मात्र कालच निवडणुसाठी मतदान संपल्यानंतर रात्री एका ठिकाणी चक्क भाजपा उमेदवाराच्या गाडीमध्येच मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम सापडल्या. यासंदर्भात सर्वच विरोधी पक्षांनी भाजपावर निशाणा साधला आहे. निवडणूक आयोगाने याबद्दल स्पष्टीकरणही दिलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Robert Vadra Corona Positive: रॉबर्ट वाड्रांना कोरोनाची लागण; प्रियंका गांधी आयसोलेशनमध्ये

RRR | प्रदर्शनाआधीच ‘RRR’ची रेकॉर्ड ब्रेक कमाई