in ,

Monsoon 2021 | राज्यात जोरदार पावसाची एंट्री

सर्वजण वाट पाहणाऱ्या मान्सूनचं राज्यात आगमन झालं आहे. राज्यात मान्सून अलिबाग, रायगड, पुणे आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पोहचला असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

दोन दिवसांत देशात अनेक भागात थोड्या-फार प्रमाणात पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे. भारतात जून ते सप्टेंबर दरम्यान सर्वाधिक पाऊस पडतो. यावर्षी हवामान खात्याकडून देशभरात सामान्य हंगामी पावसाचा अंदाजा सांगितला असून, सरासरीपेक्षा १०१ टक्के जास्त पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. केरळमध्ये यंदा दोन दिवसांपूर्वीच मान्सून पावसाला सुरूवात झाल्यामुळे कोकणात वरूण राजाचे आगमण लवकर झाले आहे. मराठवाड्यासह विदर्भात पावसाच्या सरी बरसायला सुरूवात झाली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भारतीय लसीच्या प्रभावावर अमेरिकेचा विश्वास नाही?

“आरक्षणासाठी मराठ्यांची तिसरी लाट येणार”