in

Rajan Mishra Death : शास्त्रीय गायक राजन मिश्र यांचे दिल्लीत निधन

प्रख्यात शास्त्रीय गायक पद्मभूषण राजन मिश्र यांचा हृदयविकारामुळे मृत्यू झाल्याची घटना दिल्लीत घडली आहे. त्यांना कोरोनाचा संसर्ग देखील झाला होता.

दरम्यान, सकाळी त्यांची तब्येत खालावली. अखेर मिश्र यांना सेंट स्टिफन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र संध्याकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील राजन मिश्र यांच्या निधनाबद्द शोक व्यक्त केला आहे. “ शास्त्रीय गायनाच्या जगात आपली ठसा उमटवणाऱ्या पंडित राजन मिश्र यांच्या निधनामुळे अत्यंत दुःख झाले आहे. बनारस घराण्याशी जुडलेल्या मिश्र यांचे जाणे संगीत व कला विश्वाचे मोठे नुकसान आहे. मी त्यांच्या कुटुंबीयांच्या व चाहत्यांच्या दुःखात सहभागी आहे.” असं मोदींनी ट्वट केलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Rain | राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस; हवामान खात्याचा इशारा

मुंबईत उद्यापासून सर्वांना लस मिळणार… सर्व लसीकरण केंद्र कार्यान्वित