in

वर्ध्यात रेमेडिसिव्हीर उत्पादक जेनेटिक लाईफ सायन्सेसला राजेंद्र शिंगणेची भेट

प्रतिनिधी – भूपेश बारंगे
वर्ध्यात रेमेडिसिव्हीर इंजेक्शनचे उत्पादन करणारी वर्ध्याच्या सेवाग्रामस्थित एम आय डी सी मधील जेनेटिक लाईफ सायन्सेस या औषध निर्मिती कंपनीला आज अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी कंपनीमध्ये तयार होणाऱ्या सर्व औषधांबाबत माहिती जाणून घेतली. दुसऱ्या लाटेच्या शिखर कालावधीत रेमेडिसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झालेला असताना जेनेटिक लाईफ सायन्सेस यांनी रेमेडीसीव्हीर औषध तयार करण्यास पुढाकार घेतला. त्यासाठी केंद्रीय महामार्ग व परिवहन मंत्री नितीन गडकरी, केंद्र व राज्य शासन, अन्न व औषध प्रशासन विभाग, आणि हैदराबाद येथील हेटरो या मल्टी नॅशनल कंपनीने केलेल्या सहकार्यामुळे वर्धा जिल्ह्यात अगदी कमी कालावधीत औषध तयार करण्यासाठी मान्यता मिळाली असे राजेंद्र शिंगणे यावेळी म्हणाले. रेमडिसिव्हीर औषधाची निर्मिती सुरू झाली त्याचवेळी भेट देणार होतो, मात्र त्यावेळी कोरोनाच्या संसर्गामुळे रुग्णालयासाठी लागणारा ऑक्सिजनची मागणी आणि निर्मितीमध्येही तफावत निर्माण झाली होती. त्याच्या पुर्ततेमध्ये व्यस्त असल्यामुळे येणे शक्य झाले नसल्याचे श्री शिंगणे यांनी यावेळी सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

20 वर्षीय महिला नक्षलीचे आत्मसमर्पण; 2 लाखाचा होता इनाम

बीड जिल्ह्यातील मृत्युदर चिंताजनक, आरोग्यमंत्र्यांचा बीड दौरा