in

ग्रामीण भागात दर्जेदार सेवेसाठी नव्या पदांची भरती… राज्य सरकारचा मोठा निर्णय!

ग्रामीण भागातील आरोग्याच्या पायाभूत सेवा बळकट करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्याच्या ग्रामीण भागामध्ये बांधकाम पूर्ण झालेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ११८ नवीन आरोग्य संस्थांसाठी पदे भरण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

या आरोग्य संस्थांसाठी ८१२ नियमित पदे निर्माण करण्यास तसेच १ हजार १८४ कुशल मनुष्यबळ सेवा, २२६ अकुशल मनुष्यबळ सेवा अशी एकूण २ हजार २२२ पदे उपलब्ध होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनतेला अधिक दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी मदत होईल, असे ते म्हणाले.

ज्या आरोग्य संस्थांचे बांधकाम ७५ टक्के पूर्ण झाले आहे, तसेच काम पूर्ण झालेल्या उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर युनिट इत्यादी आरोग्य संस्थांकरीता आवश्यक असणाऱ्या पदांचा आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे. रुग्णसेवा पुरवण्यासाठी या रुग्णालयांच्या ठिकाणी आकृतीबंधानुसार पदनिर्मिती करण्यास मान्यता मिळाली असून त्याबाबतचा शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वाघ शिकार प्रकरण; दोघा आरोपींना चार दिवसांची वन कोठडी

केंद्र सरकारनं दिली ७४ कोटी लसींची ऑर्डर