in

मानसिक तयारी ठेवा; आरोग्यमंत्री टोपेंचा इशारा

राज्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यानं राज्यातील निर्बंध अधिक कठोर केले जाण्याची शक्यता आहे. लॉकडाउनवरून राज्य सरकारमधीलच तिन्ही पक्षांमध्ये अंतर्गत समन्वय नसल्याचं चित्र आहे.

निर्बंध कठोर करून यासंबंधीची घोषणा होण्याची शक्यता आहे. नियमा पाळल्यास लॉकडाउन टाळू शकतो, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. शरद पवारांच्या प्रकृतीविषयी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत टोपे बोलत होते.

राज्यात लसीकरण वेगानं सुरू आहे. हर्ड इम्युनिटी आणण्याचा प्रयत्न असून त्यातून रुग्णसंख्या कमी होताना दिसेल, असंही टोपे म्हणाले. लॉकडाउनबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यासंदर्भात चर्चा मात्र नेहमी सुरू असते.

निर्बंध कडक करण्यासंबंधीची पावलं राज्य शासनच उचलणारच आहे. त्यादृष्टीनं लोकांनी मानसिकता ठेवली पाहिजे. गर्दी टाळावी हाच दृष्टिकोन आहे. गर्दी होणाऱ्या सर्व ठिकाणी कठोर निर्बंध आणण्यासाठी नियोजन करत आहोत, असंही टोपे म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

रोहित मोन्सेरात पणजीचे नवे महापौर

‘४५ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण दोन आठड्यात पूर्ण करा’