in ,

‘विरार दुर्घटना ही काही नॅशनल न्यूज नाही’; आरोग्यमंत्र्यांचं विधान

वसई विरारमधील एका रुग्णालयातील कोव्हिड सेंटरला भीषण आग लागली. यात १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला. याविषयी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संवेदनाहीन वक्तव्य केलं आहे. विरार रुग्णालयातील दुर्घटना ही काही नॅशनल न्यूज नाही, असं विधान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.

विजय वल्लभ रुग्णालयातील आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख आणि गंभीर जखमी रुग्णांना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. याविषयी बोलतानाच टोपे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

आपण रेमडेसिवीरवर बोलू शकतो. ऑक्सिजनबाबत बोलू शकतो. पण विरारची घटना ही काही नॅशनल न्यूज नाही. ही राज्यातील घटना आहे. राज्य सरकार त्यावर सर्वोतोपरी मदत करेल” असं टोपे यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींशी ऑक्सिजनसंदर्भात बोलणार आहोत. रेमडेसिवीरसंदर्भात बोलणार आहोत. ही घटना (विरार रुग्णालय आग) ही नॅशनल न्यूज नाही. आम्ही राज्य सरकारच्या वतीने पूर्णपणे मदत करणार आहोत” असं आरोग्य मंत्र्यांनी म्हटलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी उपाययोजना करणार

मोफत ऑक्सिजन पुरवणारा मुंबईकर पुन्हा चर्चेत