in

पंढरपूर पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी राजू शेट्टी पंढरीत

महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची एफ आर पी आणि 100 युनिटपर्यंत घरगुती वीज बिल माफ करावे. शेतकरी संघटना आता सरकारच्या अपयशावर बोट ठेवणार असल्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपला उमेदवार दिलेला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार समोरील अडचणीत वाढ झालेली आहे. आता खुद्द स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आपला उमेदवार विजयी करण्यासाठी मतदारसंघांमध्ये तळ ठोकलेला आहे.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील आमच्या मागण्यांचा विचार करण्याबाबत बोलतात आधी शेतकऱ्यांची एफ आर पी द्या आणि घरगुती वीज बिल माफ करा हीच आमची मागणी असल्याचे उत्तर त्यांनी जयंत पाटलांना दिलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं शेतकऱ्यांचे पैसे बुडवणाऱ्या साखर कारखानदाराला उमेदवारी देताना आम्हाला विचारात घेतले होते का असा प्रश्न शेट्टी यांनी राष्ट्रवादीला विचारला आहे. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक मधील दोन उमेदवार साखर कारखानदार आहेत त्यांनी शेतकऱ्यांचे पैसे थकवले आहेत. यांच्याकडे निवडणूक लढवायला पैसे आहेत. पण शेतकरयां साठी पैसे नाहीत हे दुर्दैव आहे. अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘शेतकरीविरोधी कृषी कायदे रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही’

अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण