in

रणवीर-दीपिका झाले अलिबागकर

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि पती रणवीर सिंह लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहेत.
सिनेसृष्टीचे आघाडीचे कलाकार रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण हे आता अलिबागकर झाले आहेत.

अलिबाग तालुक्यातील मापगाव येथे ९० गुंठे जागा २२ कोटीला खरेदी केली आहे. मुंबईपासून जवळ असलेल्या अलिबागमध्ये आता दीपिका आणि रणवीरने दोन बंगले खरेदी केले आहेत.


दीपिका आणि रणवीरने खरेदी केलेल्या या जागेत दोन बंगले असून नारळ सुपारीची बाग आहे.सोमवारी अलिबाग येथील दुय्यम निबंधक कार्यलयात याची नोंदणी करण्यासाठी दीपिका आणि रणवीर दोघेही आले होते.


मुंबईतून सागरी मार्गाने अवघ्या काही तासात पोहोचणे शक्य असल्याने देशभरातील गर्भश्रीमंत, उद्योजक, सिनेकलाकार यांनी यापरिसरात गुंतवणूक सुरु केली आहे. टाटा, बिर्ला, सिंघानिया, मित्तल या उद्योजकांनी यापुर्वीच अलिबाग परिसरात आपली घरे घेतली आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Aayre

Rajapur