in

कपिल देव यांची भूमिका साकारण्यासाठी रणवीरची दिवसरात्र मेहनत, अशी केली तयारी

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंहचा 83 हा चित्रपट 24 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. रणवीर या चित्रपटामध्ये क्रिकेटर कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. हा ट्रेलर पाहून अनेकांनी रणवीरच्या अभिनयाचे कौतुक केले. तो हुबेहूब कपिल देव यांच्या सारखा दिसत आहे, अशी कमेंट अनेकांनी केली. कपिल यांची भूमिका साकारण्यासाठी रणवीरने बरीच मेहनत घेतली. जाणून घेऊयात 83 मध्ये कपिल देव यांची भूमिका साकारण्यासाठी रणवीरने कशी तयारी केली.

एका मुलाखतीमध्ये रणवीरने सांगितले की, कपिल देव यांची भूमिका साकारणं त्याच्यासाठी अत्यंत चॅलेंजिंग होतं. रणवीरने त्याच्या फिटनेसकडे विशेष लक्ष दिलं. 6 महिने त्याने तयारी केली. रणवीर दिवसातील 4 तास मैदानावर क्रिकेटची प्रॅक्टिस करत होता. सिंम्बा चित्रपटासाठी रणवीरने वजन वाढवले होते.

त्यामुळे 83 चित्रपटासाठी त्याला वजन कमी करावे लागले. दररोज 2 तास तो जिममध्ये वर्कआऊट करत होता. एका रिपोर्टनुसार, चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारण्यासाठी रणवीर काही दिवस कपिल देव यांच्या घरी जाऊन त्यांचे बारकाईने निरीक्षण करत होता.

चित्रपटात दीपिका पदुकोण, पंकज त्रिपाठी, बोमन इराणी, साकिब सलीम, हार्डी संधू, ताहिर राज भसीन, जतीन सरना यांच्याही भूमिका आहेत. दीपिका या चित्रपटाची सहनिर्माती आहे. हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

हिवाळी अधिवेशन सुरू; शक्ती विधेयकाला केंद्राचही सहकार्य मिळेल- निलमताई गोऱ्हे

ईडी चौकशीवर रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…