in

आंबा घाटात दरड कोसळली; वाहतूक पूर्णत बंद

निसार शेख, रत्नागिरी | रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील अंबाघाट येथे दरड कोसळल्याने वाहतूक बंद झाली आहे. परतीचा पाऊस जोरदार सुरू असल्यामुळे ही दरड कोसळली आहे.

दख्खन गावा जवळ ही दरड कोसळली आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या वतीने ही दरड हटवण्याचे काम सुरू आहे.मात्र किती वेळ लागेल हे अनिश्चित आहे. त्याचप्रमाणे अवजड वाहतूक बंद असताना पुन्हा एकदा आंबा घाट कोसळल्याने वाहनधारकांची पंचायत झाली आहे.

सर्वच प्रकारची वाहतूक बंद झाली आहे.पोलीस प्रशासन ,सार्वजनिक बांधकाम विभाग ह्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.त्यामुळे वाहतूक केव्हा सुरू होईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज्यपाल गडचिरोली दौऱ्यावर

निलेश राणेंचा शिवसेनेला झटका;पंचायत समितीमधील शिवसेनेच्या तीन सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश