in

लस खरेदी साठी ठेवलेला सात हजार कोटीचा चेक शेतकऱ्यांसाठी खर्च करावा – रावसाहेब दानवे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या कोरोना लसीकरनासाठी सात हजार कोटी रुपये खर्च करण्यासाठी जो चेक तयार ठेवला होता ,तो पैसा पावसाळ्याच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांनसाठी खर्च करावा असा सल्ला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलाय. राज्य सरकारनं मोफत लसीकरणासाठी सात हजार कोटी रुपयांचा एकरकमी चेक तयार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र काल पंतप्रधानांनी सर्वांचं लसीकरण हे मोफत होणार असल्याचं म्हंटलंय आहे त्यामुळं हा सात हजार कोटींचा चेक राज्य सरकारनं शेतकर्यांसाठी खर्च करावा. त्याचबरोबर राज्यसरकार कडून राज्यातील जनतेला आता अपेक्षा उरल्या नसून,कोरोना काळात राज्यसरकार ने एकही दिलासादायक घोषणा केली नसल्याचे सांगत आता शिल्लक सात हजार कोटी चा चेक कुठे जातो हे जनता पाहणार असल्याचा टोला देखील रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारला लगावलाय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत दुपारनंतर पावसाचा जोर वाढला

विद्यार्थ्यांना ऑनलाईन उपस्थितीसाठी 1200 रुपये भत्ता