पेट्रोल-डिझेलचे दर कमी जास्त होताना दिसत आहे आणि याचा सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम होतो आहे. मात्र आज पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. आज राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 90.56 रुपये आहे. तर आज इथे डिझेलची किंमत प्रति लिटर 80.87 रुपये आहे. त्याचप्रमाणे आर्थिक राजधानी मुंबईत आज पेट्रोलची किंमत 96.98 रुपये तर डिझेलची किंमत प्रतिलिटर 87.96 रुपये आहे.
मुंबई 96.98 87.96
दिल्ली 90.56 80.87
कोलकाता 90.77 83.75
चेन्नई 92.58 85.88
नोएडा 88.91 81.33
पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा
एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता.
Comments
Loading…