राज्यात नाईट कर्फ्यु लागू होऊन निव्वळ दोन दिवस झाले आहेत. याचा परिणाम कुठेतरी आजच्या नवीन रुग्णांच्या आकडेवारीत दिसून येत आहे. रविवारच्या तुलनेत आजची आकडेवारी किंचित घटली आहे. आज तब्बल 31 हजार 643 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे हा किंचित दिलासा आहे.
आज दिवसभरात राज्यात 31 हजार 643 नवीन कोरोनाबाधित आढळले असून, 102 रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर आता 1.98 टक्के इतका आहे. राज्यात आज रोजी एकूण 3 लाख 36 हजार 584 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यात आज 20 हजार 854 रुग्ण कोरोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 23 लाख 53 हजार 307 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 85.71 टक्के एवढे झाले आहे.
Comments
Loading…