in

Remdesivir | भारताच्या मदतीला अमेरिका आली धावून

देशातील रेमडेसिविरचा तुडवडा कमी करण्यासाठी अमेरिकेकडून पाठविण्यात आलेल्या रेमडेसिविरच्या १ लाख २५ हजार कुपी सोमवारी दिल्ली विमानतळावर दाखल झाल्या आहेत. तर कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यासाठी भारतीय हवाई दल पूर्णपणे प्रयत्नशील आहे. भारतीय हवाई दलाच्या सी -१७ विमानाने ४ क्रायोजेनिक ऑक्सिजन टँकर्स जर्मनीहून उड्डाण करत हिंडन विमानतळावर पोहोचवले असून या व्यतिरिक्त ४५० ऑक्सिजन सिलिंडर्सही यूकेमधून विमानाने चेन्नईच्या विमानतळार आणले असल्याची माहिती भारतीय हवाई दलाने दिली आहे.

उद्या ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात व्हर्च्युअल बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी ब्रिटनने आणखी १००० व्हेंटिलेटर भारतात पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या गंभीर कोरोना रुग्णांचे आरोग्य सुधारण्यास मदत होणार असल्याची माहिती भारत सरकारकडून देण्यात आली आहे. तर गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला ब्रिटनने २०० व्हेंटिलेटर, ४९५ ऑक्सिजन कंसनट्रेटर्स आणि ३ ऑक्सिजन जेनेरेशन युनिट देखील देणार असल्याचे सांगितले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

देशातील ‘या’ १३ नेत्यांची केंद्र सरकारकडे मोफत लसीकरणाची मागणी

IPL मधील ‘हे’ 2-3 खेळाडू कोरोनाच्या विळख्यात; आजचा सामना पुढे ढकलला