in

मुंबई लोकलवर निर्बंध आवश्यक; विजय वडेट्टीवार

लोकल बंद असल्यामुळे मुंबईत कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत. मुंबई लोकलवर काही दिवस निर्बंध लावावाच लागेल. 15 दिवस तरी लोकलची गर्दी कमी करावीच लागणार आहे, असं राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

विजय वडेट्टीवार म्हणाले, “राज्यातील 14 जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. तिथे कडक लॉकडाऊन लावण्यात यावा. लोकल बंद असल्यामुळे मुंबईतील रुग्णसंख्या कमी झाली आहे. लोकलमध्ये काही दिवस निर्बंध लावाच लागे

दरम्यान, दहावीच्या परीक्षावरुन कोर्टाने सरकारकडे विचारणा केली आहे. मात्र दहावीच्या परीक्षा रद्द करण्यावर शिक्षण विभाग ठाम आहे. दोन दिवसात त्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतल्यामुळे मराठा आरक्षण रद्द झालं आहे. मराठा आरक्षण देण्यासाठी सरकारच्या हातात काही राहिले नाही. केंद्र सरकारने कलम 102 निर्णय घेतला पाहिजे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

कोर्टाने गायकवाड आयोगावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. हे तत्कालिन राज्य सरकारचे दुर्लक्ष म्हणावं लागेल. त्यांनी निवडणुकीच्या वेळी घाईगडबडीत निर्णय घेतला, असा आरोप वडेट्टीवारांनी केला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भारत बायोटेकची बूस्टर डोसची चाचणी सुरू

परमबीर सिंग यांना ९ जूनपर्यंत अटक न करण्याचे राज्य सरकारचे उच्च न्यायालयाला आश्वासन