in

अमानवीय ! मुंबईत बलात्कार करुन गुप्तांगात घुसवला रॉड

मुंबई महिलेवर बलात्कार करून गुप्तांगात रॉड घुसवल्याचा अमानवीय क्रृत्य समोर आले आहे. साकीनाका येथील खैरानी रोड परिसरात ही घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली असून, आणखीण आरोपींचा यामध्ये सहभाग असल्याचा संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.

पीडित महिला ३० वर्षांची असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास कंट्रोल रुमला साकीनाका येथे खैराना रोडवर एक महिला रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडली असल्याचा फोन आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त आणि अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी महिलेला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केलं. महिलेवर उपचार सुरु असून स्थिती सध्या खूप गंभीर आहे. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे. मात्र यामध्ये अजून आरोपी सहभागी असावेत असा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अभिनेते सयाजी शिंदे यांनी ‘गोमय गणेशाची’ केली प्रतिष्ठापना

Maharashtra Corona | राज्यात ४ हजार १५४ नवीन कोरोनाबाधित