in

RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्ज आमने सामने

आयपीएलच्या 14 व्या पर्वात आज एम एस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई तर दुसरीकडे विराटच्या नेतृत्वाखालील बंगळुरु संघ आज आमने सामने येतील.आज दुपारी साडे तीन वाजता या सामन्याला सुरुवात होईल. मुंबईच्या वानखेडे मैदानावर हा सामना उभय संघांमध्ये खेळविण्यात येईल.

बंगळुरुने पाठीमागील चार मॅचेस लागोपाठ जिंकल्या आहेत तर चेन्नईने पाठीमागील तीन मॅचेस एकापाठोपाठ एक जिंकल्या आहेत. बंगळुरुविरुद्धची चौथी मॅच जिंकून विजयाचा चौकार लगावण्याचा प्रयत्न चेन्नईचा संघ करेल. तर पूर्ण फॉर्मात असलेल्या बंगळुरुचा संघ विजयाचा पंच लगावण्यास सज्ज आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

विरार रुग्णालय दुर्घटना; जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ चौकशी समितीच्या अध्यक्षपदी

तुझं डोकं ठिकाणावर आहे का ? म्हणतं नेटीझन्सने कंगनाला घेतले फैलावर