in

Sachin Vaze | NIA च्या हाती महत्त्वाची कागदपत्रं; अधिकाऱ्यांची नावं उघड!

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती, त्यानंतर या गाडी मालकाचा मृतदेह सापडला होता, या दोन्ही प्रकरणाचा तपास NIA करत असून त्यांच्या हाती काही महत्त्वाची कागदपत्रं सापडली आहेत. यात मुंबई पोलीस दल आणि प्रशासनातील काही अधिकाऱ्यांची संशयास्पद नावं आहेत, या लोकांना लाच म्हणून दर महिन्याला पैसे दिले जायचे याचा उल्लेख आहे.

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्या तपासादरम्यान दक्षिण मुंबईतील गिरगाव येथे असणाऱ्या एका क्लबवर छापा टाकण्यात आला, याठिकाणी अनेक कागदपत्रे सापडली, NIA याचा शोध घेत आहे, ७ एप्रिलपर्यंत सचिन वाझे NIA कोठडीत आहे. या प्रकरणात NIA ने क्लबचे मालक आणि अन्य लोकांकडे स्पष्टीकरण मागितलं आहे. आवश्यकता भासल्यास ही कागदपत्रे NIA कडून आयकर खात्याला किंवा सीबीआयला सोपवण्यात येणार आहेत.

What do you think?

-5 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

तापमान चाळीशीवर; वाढणाऱ्या उकाडामुळे नागरिक हैराण

गृहमंत्री अनिल देशमुख यांना धक्का; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय