in

Sachin Vaze Letter: वाझेचा ‘लेटरबॉम्ब’, वाचा काय लिहिलंय पत्रात!

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी फोडलेल्या लेटरबॉम्बनंतर आता सचिन वाझेने देखील पत्र लिहिले आहे. यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात आणखी एक स्फोट झाल्याचे चित्र आहे. सचिन वाझेने तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन कोटी रुपये मागितल्याचा आरोप केला असून अन्य नेत्यांवरही आरोप झाले आहेत. यामध्ये परिवहन मंत्री अनिल परब यांचे नाव आता समोर आले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील तिसरी विकेट पडणार, असे म्हणणाऱ्या विरोधकांना आयतं कोलीत मिळालं आहे.

एनआयएला वाझे यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात पत्र लिहिले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा २०२० मध्ये मला पोलीस दलात घेण्याला विरोध होता. शरद पवारांची माझी नियुक्ती रद्द करण्यात यावी, अशी इच्छा होती. पण, शरद पवारांचे मतपरिवर्तन आपण करू, त्याचबरोबर गुन्हेगारी गुप्तवार्ता शाखेत नियुक्ती करू, असे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मला नागपूरमधून फोनवर सांगितले होते. देशमुख यांनी या कामासाठी माझ्याकडून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली असल्याचा दावा वाझेने पत्रात केला आहे.

देशमुख यांनी ऑक्टोबर २०२०मध्ये मला सह्याद्री अतिथीगृहावर बोलावले होते आणि शहरातील १ हजार ६५० रेस्टॉरंट्स आणि बार यांच्याकडून वसूली करण्यास सांगितले होते. त्यावेळी आपण त्यांना हे आपल्या क्षमतेपलिकडे असल्याचे सांगितले. त्याचबरोबर अनिल परब यांनी जुलै-ऑगस्ट २०२० मध्ये त्यांच्या शासकीय बंगल्यावर बोलावले होते. डीसीपींच्या बदल्या होण्याच्या तीन-चार दिवसांआधी परब यांनी बोलावले होते. एसबीयुटी बद्दलच्या तक्रारीची चौकशी करण्यास सुरुवातीला सांगितले. त्यानंतर विश्वस्तांना घेऊन येण्यास सांगितले होते. त्याचबरोबर परब यांनी चौकशी थांबवण्यासाठी ५० कोटी रुपये मागितले होते. हे काम करण्यास आपण असमर्थता दर्शवली. कारण आपल्याला त्याबद्दल माहिती नव्हती. त्याचबरोबर चौकशीवरही आपले कोणतेही नियंत्रण नसल्याचे वाझे यांनी पत्रात म्हटले आहे.

मंत्री अनिल परब यांनी जानेवारी २०२१ मध्ये आपल्याला पुन्हा शासकीय बंगल्यावर बोलावले आणि बृहन्मुंबई महापालिकेच्या यादीतील काही ठेकेदारांची चौकशी करण्यास सांगितले. २ कोटी रुपये अशा ५० ठेकेदारांकडून वसूल करण्यास त्यांनी सांगितले होते. या प्रकरणाची चौकशी अज्ञात तक्रारींच्या आधारावर सुरू होती. ठेकेदारांविरोधातील तक्रारींची गुन्हेगारी गुप्तवार्ता शाखा अर्थात क्राईम इंटेलिजन्स विभागाने केलेल्या तपासातून काहीही निष्पन्न झाले नाही, असे वाझे याचे म्हणणे आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमातून साधला विद्यार्थ्यांशी संवाद

Second Wave Corona; पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत फरक काय ?