in

सचिन वाझेंची तब्येत पुन्हा बिघडली; उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात हलवलं

मनसुख हिरेन हत्येप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात असलेल्या सचिन वाझे यांची तब्येत पुन्हा बिघडल्याची माहिती समोर आली आहे. रात्री 10.30 च्या सुमारास NIAच्या अधिकाऱ्यांनी वाझे यांना मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात नेले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर रात्री 1.30च्या सुमारास सचिन वाझे यांना परत आणण्यात आल्याची माहिती आहे.

सचिन वाझे यांची याआधीही प्रकृती एकदा बिघडली होती. तेव्हाही त्यांना उपचारासाठी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात नेण्यात आलं होतं. तसेच त्यावेळी एनआयएच्या कार्यालयात मध्यरात्री डॉक्टरांना पाचारण करण्यात आलं होतं.

काही दिवसांपूर्वीच सचिन वाझे यांनी आपण सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हीआर आणि कॉम्प्युटर मिठी नदीत टाकल्याची कबुली दिली होती. त्यानंतर एनआयएच्या अधिकाऱ्यांना सचिन वाझे यांना घटनास्थळी नेऊन या सर्व गोष्टी मिठी नदीतून मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने शोधून काढल्या होत्या. तसेच मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी सचिन वाझे यांच्या विरोधातही NIAने UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

1 एप्रिलपासून विमान प्रवास महागणार…

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांचे निधन