in

साईवास्तू : घरात आणि घराच्या आवारात कुठल्या प्रकारची झाडं लावू शकतो?

साईवास्तू विशेष मध्ये आज आपण वास्तू आणि ज्योतिषशास्त्राच्या नियमाप्रमाणे आपल्या घरात आणि घराच्या आवारात कुठल्या प्रकरणी झाडं लावू ते पाहू.

हिन्दू धर्मात प्रकृती ही ईश्वराच साक्षात् प्रतिनिधित्व करत असते. जी व्यक्ती आयुष्यात एक पिंपळ, एक नीम, दहा चिंच, दहा काथ, तीन बेल, तीन आवळा आणि पांच आंब्याच्या झाडांची लागवड करते, तिच्या पाठिशी कित्येक जन्माची पुण्य जमा होतात अस म्हटलं जात.

हिन्दू धर्मानुसार आपल्या वास्तु किंवा पत्रिकेतील अनिष्ट ग्रहांची तीव्रता कमी करावयास, तसेच पंचतत्व सन्तुलित करण्यास वृक्ष किंवा झाडांचा उपयोग आपण करू शकतो. प्रत्येक ग्रहानुसार, दिशेनुसार, राशीनुसार आणि नक्षत्रानुसार आपण पाहु कुठली झाड एक उपायशास्त्र म्हणून आपल्याला विशेष फलदायी ठरू शकतात. आपल्या पत्रिकेतील ग्रहांचे अनिष्ट परिणाम कमी करायचे असतील किंवा सकारात्मक परिणाम वाढवायचे असतील तर, नमूद केलेल्या ग्रहांच्या मूळ्या ठराविक रंगांच्या कापडात बांधून जवळ ठेवाव्यात.

सूर्य ग्रहकारिता, रविवारी बेलपत्राची मूळी लाल धाग्यांमध्ये. चंद्र ग्रहकारिता, सोमवारी खिरणी किंवा रंजण झाडाची मूळी सफ़ेद कापडात, मंगळ ग्रहकारिता, मंगळवारी खैराची मूळी किंवा कडुनिंबाची पान लाल कापडात. बुध ग्रहकारिता, बुधवारी विधारा किंवा समुद्रशोक मूळी हिरव्या कापडात. गुरु ग्रहकारिता गुरुवारी केळीच्या झाडाची मूळी पिवळ्या कापडात. शुक्र ग्रहकारिता शुक्रवारी उंबराच्या झाडाची मूळी पांढऱ्या कापडात. शनि ग्रहकारिता शनिवारी शमीच्या झाडाची मूळी काळ्या कापडात. राहू ग्रहकारिता बुधवारी सफेद चंदनाची निळ्या कापडात. केतु ग्रहकारिता गुरुवारी अश्वगंधाच्या झाडाची मूळी निळ्या कापडात. 

आपल्या जन्म चंद्रराशीनुसार इष्ट वृक्ष, मेष – आवला, वृषभ – जामुन, मिथुन – शिसम, कर्क – नागकेश्वर, सिंह – पळस, कन्या – रीठा, तुला – अर्जुन, वृश्चिक – भालसरी, धनु – जलवेतस, मकर – अकोन, कुंभ – कदम्ब, मीन – कडुलिंब. आपल्या आयुष्यात यश, कीर्ती, समृद्धिकरता घराच्या दक्षिणेस किंवा आग्नेय दिशेस मोठ्या पानांची झाड़ किंवा चंपा, गुलाब हि रोप लावू शकता. आपल्या घरात रोकड़ि रक्कम किंवा आर्थिक टंचाई भासत असल्यास किंवा श्रीमहालक्ष्मीची स्थापन करावयाची असल्यास घराच्या पूर्व, आग्नेय दिशेस डाळिंबाचे झाड़ जरूर लावा.

आपल्या घराच्या बालकनित उत्तर, ईशान्य दिशेत लहान रोपट लावावित. शक्यतो मोठ्या पानांची जड़त्व तयार होईल अशी झाड़ टाळावीत. मनीप्लांट काचेच्या बाटलीत पाण्यात वाढवून त्याच रोप उत्तरोत्तर उर्ध्व दिशेस वाढावे. घराच्या उत्तरेकडे निळ्यारंगाची छोटी फूल किंवा रोपटी समृद्धिसाठी लावावीत. आपल्या घराच्या पश्चिमेकडे बोधवृक्ष म्हणजेच पश्चिमेकडील पिंपळ वृक्षाचे झाड़ लावावे. आपल्या घराच्या नैऋत्य दिशेस कुठलेही झाड़ लावू नये. इथे पृथ्वीतत्व असते. पंचतत्व नियमानुसार एक तत्व सोडून आधीचे तत्व त्या तत्वाला नष्ट करते. त्यामुळे वायुतत्व पृथ्वीतत्वाला नष्ट करते म्हणजे वृक्ष पृथ्वीला भेदून उगवते. नैऋत्य दिशा आपले नातेसंबंध, कलाकौशल्याचे प्रतिक असते त्यामुळे नैऋत्येकडे कुठलाही वृक्ष वर्जित आहे.

जर का तिथे आधीच वृक्ष असतील तर आजूबाजूला केळी, झेंडू, डाळिंब असे वृक्ष लावून त्यांचा नकारात्मक परिणाम कमी करावा. आपल्या घरात कधीच कडुलिंब, कड़ीपत्ता, हिरव्या मिरचीचे झाड़ लावू नये त्यामुळे आपल्या घरात किंवा नातेसंबंधात कडवट, तिखटपणा येवू शकतो. आपल्या घरात कधीच तुळशीचे रोप नसाव कारण त्याच स्थान हे कायम अंगणातच आहे. फ्लैट सिस्टम मध्ये घरच्या व्हारांड्यात किंवा बालकनीमध्येच तुळस लावावी. तुळस आपल्या घरातील वातावरणाचे शुद्धिकरण करते. बाम्बूमध्ये विषारी टॉक्सिक घटक असल्यामुळे त्याचा वापर उदबत्तीच्या माध्यमातुनसुद्धा टाळावा. बाम्बूचे रोपटे वास्तुमध्ये वर्जित आहे. कधीच काटेरी, निवडुंग यासारखे वृक्ष आपल्या वास्तुत कुंपणाला सुद्धा नसावेत.

फक्त अलोय वोरा – कोरफड काटेरी असूनही घरात शुभ मानली आहे. आपल्या स्वप्नामध्ये कधी शुभ फळ-फूल देणारे वृक्ष येत असतील तर त्याला शुभसंकेत समजावेत. परंतु जर वृक्ष अंगावर कोसळून जाग येण, तुटलेल वृक्ष स्वप्नामध्ये दिसण अशुभ संकेत, शारिरिक पीड़ा, नुकसान संभवते. घरात नेहमी सम संख्या असलेली झाड़ किंवा रोपटी असावीत. डाळिंबाचे झाड़ आवारात असण म्हणजे साक्षात् श्री महालक्ष्मीच प्रतीकच. लक्ष्मीप्राप्ति, घरातील वैधःत्व जाण्यासाठी तसेच कर्जमुक्ति साठि इष्ट असत.हळदिच झाड आणि झेंडूच झाड़ घरामध्ये गुरुतत्व प्रस्थापित करत,  नकारात्मकता नष्ट करत आणि वैवाहिक जीवन सुखी करत.कृष्णकांताचे उत्तरेकडचे झाड़ घरामध्ये समृद्धिवर्धक असते. आर्थिक प्रश्न मार्गी लागतात.नारळाचे झाड़ भरभराट, मानसन्मान, परिपक्वता देत. श्वेतार्क – मंदार रुईचे झाड़ आपल्या आयुष्यात विघ्ननाशक, अडचणीना मात करण्यासाठी, गणेशाच प्रतिक म्हणून लावल जात. परन्तु अचानक उगवलेल रुई चे रोपटे जातकास विशेष फलप्राप्ती देत. वड घराच्या आवारात असण अशुभ असून त्याची सावली घरावर पडू नये.

घराच्या आवारात आंब्याचे झाड़ लहानमुलांसाठी इष्ट नसून फ़क्त महत्वाच्या कामाला जाताना आंब्याचा मोहोर पाहून निघण खूपच शुभ असत. गावठी अशोक शुभ असून त्याच महत्व रामायणा पासून द्न्यात आहे. अशोकवाटिकेमध्ये सीतेने याच वृक्षाखाली बसून आपल्या सुटकेची इच्छा पूर्ण करुन घेतली म्हणूनच शुभ कार्याना निघताना अशोकाची पान बरोबर ठेवली जातात.आवळ्याचे झाड़ घरामध्ये प्रतिकार शक्ति वृद्धिगत करते. परतुं आवाराच्या नैऋत्य किंवा आग्नेय दिशेस नसाव. परिजातक किंवा प्रजाक्ताचे झाड़ अंगणात आलेल्या प्रत्येकाचा थकवा घालवते. या एकाच झाडाची फुल जमिनीवर पडली तरी आपण देवाला वाहु शकतो.

आपण पहिल की निसर्ग, प्रकृतीनियम आपल्याला प्रपंच आणि परमार्थ यामधला समतोल साधण्यास मदत करत असतात. त्यामधल एक माध्यम म्हणजे वृक्षवल्ली त्यांच अस्तित्व आणि त्यांच आपल्या आयुष्याशी असलेल नात पहायचा छोटासा प्रयत्न केला. वनस्पती ही ग्रहण आणि उत्सारण करत असते, त्याला फक्त आपणाला दिशा द्यायची असते. काटेरी वनस्पति जशी आपल्या अस्तितवाला टोचू पाहते पण एखाद्या फुलाच्या सुंगधाला जर योग्य दिशा दिली तर त्या सुंगधाने तुमच्याकडे लोक आकर्षित होतात तसच तुमच आयुष्यसुद्धा तुमच्या वास्तुच्या प्रफुल्लित आणि आनंदित लहरिनमुळे आकर्षित होवुन चिरंतन  सुखी आणि समृद्ध होवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Covid 19 | बप्पी लहरी यांना कोरोनाची लागण

‘रजनी अण्णा’ यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर