in

‘घरात घुसून मारेन,’ सलमानच्या ‘या’ वक्तव्यावर अभिजीत बिचुकले भडकला

बिग बॉस 15 च्या फिनालेला आता अवघे काही दिवसच उरले आहेत. या बिग बॉसच्या सीजनमध्ये रश्मी, करण कुंद्रा, शमिता आणि राखी सावंत यांनी तिकीट टू फिनाले टास्क जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला. तिकीट टू टास्क दरम्यान बऱ्याच गोष्टी या बिग बॉसच्या घरात पाहायला मिळाल्या. काही स्पर्धकांमध्ये झालेल्या मारामाऱ्यांची सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. नुकतंच उमर रियाझ आणि प्रतीक सहजपाल यांच्यात बरीच बाचाबाची झाली. याच कारणामुळे बिग बॉस 15 च्या वीकेंड चा वॉर या एपिसोडमध्ये उमरला बाहेरचा रस्ता दाखवला. दरम्यान, सलमान खान हा बिचुकलेवर चिडला आहे. याचा व्हिडीओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

वीकेंडचा वॉरमध्ये सलमान खान बिचुकलेवर खूप रागावला असल्याचे पाहायला मिळाले. सलमानच्या रागाचे कारण हे अभिजीत बिचुकले याचा उद्धटपणा आहे. गेल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरी झालेल्या टास्कच्या वेळी अभिजीत बिचुकलेने देवोलिना आणि प्रतिक सहजपाल यांच्यासाठी अपशब्द वापरले.त्यामुळे ‘वीकेंडचा वॉर’ या एपिसोडमध्ये सलमान खान बिचुकलेवर भडकला.

प्रोमोमध्ये सलमान बिचुकलेला म्हणाला की, बिचुकले तुम्ही जशी शिवीगाळ केलात.कोणी दुसरे तुमच्या परिवारासोबत असे करेल तेव्हा तुम्हाला कसे वाटेल. मी तुम्हांला ही शेवटची वॉर्निंग देतो आहे. यापुढे जर असे झाले तर, केस पकडून घराबाहेर काढेन. त्यानंतर घरात घुसून मारेन असेही सलमानने बिचुकलेला बजावले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“आयोगाची खात्री पटली आहे की देशात कोरोना नष्ट झाला”, पाच राज्यांमधील निवडणुकांवरून संजय राऊतांचा खोचक निशाणा!

‘…एक दिवस सर्वांना सोडून जाणार,’जॅकी श्रॉफ यांचा व्हिडीओ चर्चेत