in

सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येण्याची गरज – संभाजीराजे

खासदार संभाजीराजे यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटून मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबात भेट घेतली. तर आज खासदार संभाजीराजेस यांनी देवेंद्र फडवणीस, बाळासाहेब थोरात तर 3 वाजता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत चर्चा करण्यात आली यावेळी या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे यावेळी संभाजीराजे यांनी म्हटल आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्दावरून राज्याचं राजकारण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक मराठा आरक्षणाच्या मुद्दावरून एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करत आहेत. तर खासदार संभाजीराजे छत्रपती सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत. आता संभाजीराजे नवा पक्ष स्थापन करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

संभाजीराजे हे नवीन पक्ष किंवा संघटना स्थापन करून, मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करू शकतात. या लढ्यात ते बहुजन समाजाला एकत्र आणून मराठा आरक्षण लढा नव्याने सुरू करतील असा अंदाज लावण्यात येत आहे. यासाठी सोशल मीडियावर कॅम्पेनही सुरू करण्यात आलं आहे.

दरम्यान संभाजीराजे हे खासदारकीचा राजीनामा देऊन मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करतील. तसेच शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाऊन पुन्हा खासदार पद मिळवू शकतात, असंही राजकीय वर्तुळात बोलल जात आहे. या संदर्भातील भूमिका संभाजीराजे आज पाच वाजता स्पष्ट कऱणार आहे. संभाजीराजे उद्या प्रकाश आंबेडकरांची भेट घेणार असल्याचं समजतं. त्यामुळे संभाजी राजे नवीन पक्ष स्थापन करणार की, महाविकासआघाडीसोबत जाणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Cabinet Meeting : आषाढी वारीवर कोरोनाचं सावट… अजित पवारांच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष

शिवराज नारियलवाले यांना जबर मारहाण करणार्‍या दोषींवर कठोर कारवाई करा!