in ,

Maratha Reservation : संभाजीराजेंची राजकीय खलबतं… शरद पवार व राज ठाकरेंची घेतली भेट


मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्दबातल ठरवण्यात आल्यानंतर या मुद्द्यावरून सध्या राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर चर्चेला तोंड फुटलं असून आता हे आरक्षण कसं मिळवता येईल, यावर खलबतं सुरू आहेत. एकीकडे राज्य सरकराने नियुक्त केलेल्या उपसमितीच्या माध्यमातून यासाठी प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे भाजपा खासदार संभाजीराजे भोसले यांनी देखील समांतरपणे मराठा आरक्षणाविषयी हालचाल करायला सुरुवात केली आहे. यासाठी ते सध्या राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.

आज संभाजीराजेंनी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवार यांनी सकारात्मकता दाखवल्याचे संभाजीराजे यांनी म्हटले. मराठा समाज किती अस्वस्थ, दु:खी आहे हे मी शरद पवारांना सांगितलं. मराठा समाजावर अन्याय होत आहे. मी सर्व परिस्थिती त्यांच्या कानावर घातली. मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, नारायण राणे, अजित पवार अशा सर्वांनाच एकत्र आणण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा अशी विनंती मी त्यांना यावेळी केली, असं संभाजीराजेंनी सांगितलं.

तसेच यानंतर ते मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी त्यांची बैठक झाली. राज ठाकरेंची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. ते जात-पात मानत नाहीत. पण गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं या मताचे ते आहेत. माझ्या भूमिकेला ते समर्थन देखील करतात, असं संभाजीराजेंनी सांगितलं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Gold- Silver Price| पाहा सोन्याचे आजचे दर

Mucormycosis | आता ब्लॅक फंगसच्या उपचारासाठीचे इंजेक्शन ‘या’ किंमतीत मिळणार