in

‘उद्रेक हा शब्दही काढू नका! कोरोनामुळे संयम ठेवा’

राज्य सरकारने जोमाने आपली बाजू मांडली. जेवढे शक्य होईल तेवढे केंद्र सरकारला यामध्ये जोडले. केंद्रानेसुद्धा प्रयत्न केले. शेवटी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. तो निकाल आहे त्याच्या पलीकडे आपण काही बोलू शकत नाही, असे मराठा आरक्षणाच्या निर्णयावर छत्रपती संभाजीराजेंनी म्हटलं आहे.

इंद्रा सहाणीच्या प्रकरणावर जाण्याची गरज नाही. याआधी ज्यांना आरक्षणातून प्रवेश मिळाला त्यांना तसेच ठेवून पुढील आरक्षणाला रद्द केले. कोणी उद्रेक करू नये. कोरोनाची महामारी सुरू आहे. आपली लोकं जगली पाहिजेत. यामुळे उद्रेक हा शब्दही काढू नका! कोरोनामुळे संयम ठेवा, असं आवाहन संभाजीराजेंनी मराठा समाजाला केलं आहे.

मी राजकारणाच्या पलीकडे या गोष्टी पाहिल्या आहेत. आधीचे सरकार चुकलं ते दुरुस्त केलं. आताचं सरकार चुकलं तिथंही दुरुस्ती केली. सर्व सरकारांनी मराठा समाजासाठी प्रयत्न केले. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राला वेगळी वागणूक दिली. अन्य राज्यांच्या प्रश्नावर त्या त्या लोकांना बोलवून घेतले, त्यांना न्याय दिला. हा मला पडलेला प्रश्न असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.

बहुजन समाजामध्ये मराठा समाजाला आणावे, यासाठी मी 2007 पासून लढत आहे. सध्याची परिस्थिती कोरोनाकडे लक्ष देण्याची आहे. आपलं काम प्रयत्न करणे एवढेच आहे. आम्ही आमचा आवाज केंद्र आणि राज्याकडे पोहोचवला, इतर राज्यांमध्ये 50 टक्क्यांवर आरक्षण दिले जाते, यावर आता अभ्यास होणे गरजेचे आहे. दोन्ही सरकारे, विरोधी पक्षांनी एकत्र बसून यावर चर्चा करावी असेही संभाजीराजे म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मोठी बातमी : सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षण रद्द

‘ठाकरे सरकारमधील समन्वयाच्या अभावामुळे आरक्षण रद्द’