in

‘ममता नावाची वाघीण सर्वांना पुरून उरेल’

सध्या देशात निवडणुकांचं वारं वाहत आहे. ४ राज्यांमधील विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विशेषत: पश्चिम बंगालमधील निवडणूक भाजपनं प्रतिष्ठेची केली आहे.

संपूर्ण ताकदीनिशी भाजपा बंगालच्या आखाड्यात उतरला आहे. दरम्यान, बंगालची जनता समजूतदार आहे. ममता नावाची वाघीण संपूर्ण भाजपाला पुरून उरणार आहे, असं शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते पत्रकारांशी संवाद साधत होते.

केंद्र सरकार कोरोनाचा पराभव करण्यासाठी नव्हे तर ममतांच्या पराभवासाठी काम करत आहे, असा टोलाही राऊत यांनी लगावला. नंदीग्राममधून ममता बॅनर्जीच जिंकणार आहेत, असंही ते म्हणाले. लोकशाही जिवतं ठेवायची असेल तर विरोधी पक्ष गरजेचा असतो, असं मतही यावेळी त्यांनी व्यक्त केलं.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विशेष फोन

Gold price today | आज पुन्हा स्वस्त झाले सोने, जाणून घ्या आजचे दर