in

चोर कधी स्वतःला चोर म्हणवत नाही; समीर वानखेडेंना राऊतांचा टोला

आर्यन खानच्या प्रकरणावरुन सध्या चांगलेच वाद निर्माण होत आहेत. क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांनी मोठे खुलासे केले आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टिका करण्यास सुरुवात केली.

यासर्व प्रकरणावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रीया दिली आहे. एनसीबी आणि समीर वानखेडे यांनी प्रभाकर साईल यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. चोर कधी स्वतःला चोर म्हणवत नाही असा निशाणा संजय राऊत यांनी समीर वानखेडे आणि एनसीबीवर साधला आहे.

यासोबतच ते म्हणाले की, भाजपाच्या लोकांना वाटते की ते आकाशातून पडले आहे. सगळे व्हिडीओ, पुरावे समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई करावी असे माझे म्हणणे आहे.केंद्रीय तपास यंत्रणांचे काम आंतरराष्ट्रीय स्तरावरील तस्करी रोखण्याचे काम आहे. छोट्या प्रमाणात ड्रग्ज पकडायचे आणि मुंबई महाराष्ट्रामध्ये जणूकाही फार मोठ्या प्रमाणात ड्रग्ज घेत आहेत असे दाखवायचे. “पुरावे आहेत का समोर? चोर स्वतःला चोर असल्याचे सांगत नाही.  मुंबईतली सिनेसृष्टी राज्याच्या बाहेर हलवायची आहे यासाठी हे धंदे सुरु आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांचे वऱ्हाड दुबईत; शेतकरी संकटात मात्र नेत्यांच्या डोक्यात क्रिकेटचे खूळ

Bigg Boss Marathi 3; बिग बॉस च्या घरात संतोष चौधरी (दादूस) यांचं अपहरण