in

“या देशाची जनता कधीच कुणाला माफ करत नाही;” संजय राऊतांचा भाजपाला इशारा

आम्ही जो त्रास भोगलाय त्या प्रत्येक सेकंदाची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल. नियती कुणालाही माफ करत नाही,” असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. या देशाची जनता कधीच कुणाला माफ करत नाही हे इंदिरा गांधी यांच्या काळातही पाहायला मिळालंय, असंही राऊतांनी यावेळी नमूद केलं.

संजय राऊत म्हणाले, “शरद पवार जे बोलत आहेत तो त्यांचा संताप, चीड आणि वेदना आहे. आमच्या मनात एक राग आहे. आम्ही महाराष्ट्रात महाविकासआघाडीचं सरकार बनवलं ते याच चिडीतून निर्माण झालेलं आहे. सत्तेसाठी काहीही करायचं, केंद्रीय तपास संस्थांचा अमर्याद गैरवापर करायचा, महाराष्ट्रात केंद्रीय संस्थांचा दुरुपयोग लोकशाही संकेतांना धरून नाही. शरद पवार यांनी सांगितलंय की तुम्हाला याची किंमत चुकवावी लागेल. या देशाची जनता कधीच कुणाला माफ करत नाही हे आपण इंदिरा गांधी यांच्या काळातही पाहिलंय.”

संजय राऊत म्हणाले, “ज्या व्यक्तीने राज्याच्या गृहमंत्र्यांवर भन्नाट आरोप केले आज तो बेपत्ता आहे, त्याला फरार घोषित करावं लागलं. ती व्यक्ती कुठे आहे हे कुणाला माहिती नाही. हे सगळ्यात मोठं विडंबन आहे. जर ते पळून गेले असतील तर त्यात केंद्र सरकारचा हात आहे. केंद्राच्या मदतीशिवाय कुणीही हवाई, समुद्री किंवा रस्त्याच्या मार्गाने देशाच्या सीमा पार करू शकत नाही. तुम्ही आमच्यावर आरोप करून त्यांना पळवून लावलंय.”

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Delhi Air Pollution : दिल्लीच्या सीमेवर ट्रकला ‘नो एन्ट्री’

लैंगिक उद्देशाने केलेला कोणताही स्पर्श हे शोषणच – सर्वोच्च न्यायालय