in

अंबानी बंधूंना SEBI चा दणका, 25 कोटींचा दंड

सिक्‍युरिटिज अँड एक्‍सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीने प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांना दोन दशक जुन्या प्रकरणात 25 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. यात अंबानी बंधूंव्यतिरिक्त इतरही काही व्यक्तींचा समावेश आहे.

हे प्रकरण रिलायन्स इंडस्ट्रीजशी संबंधित असून 2000 मधील आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने अधिग्रहण नियमांचे पालन न केल्यामुळे सेबीने ही कारवाई केली आहे. ज्या व्यक्तींना दंड ठोठावण्यात आला आहे त्यात अंबानी बंधूंव्यतिरिक्त नीता अंबानी, टीना अंबानी, के डी अंबानी आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचा समावेश आहे.

सेबीने आपल्या 85 पानांच्या आदेशात म्हटले आहे की रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रवर्तक आणि त्यांच्याशी संगनमत करणाऱ्या व्यक्ती 2000 मध्ये कंपनीच्या 5 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक हिश्‍याचे अधिग्रहण करण्याबाबत स्पष्टीकरण देण्यात अपयशी ठरल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर ही दंडात्मक कारवाई करण्यात येते आहे. 2005 मध्ये मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांच्यात वाटणी होऊन त्यांनी आपले स्वतंत्र उद्योग समूह स्थापन केले होते.

दरम्यान, सेबीच्या आदेशानुसार रिलायन्स इंडस्ट्रीजच्या प्रवर्तकांनी 2000 मध्ये रिलायन्सचे 6.83 टक्के शेअर विकत घेतले होते. हे अधिग्रहण करताना त्यांनी 1994 मध्ये बाजारात आणलेल्या 3 कोटींच्या वॉरंटचा वापर केला होता. वॉरंट रुपांतरित करून हे शेअर विकत घेण्यात आले होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘या’ विषयावर राज्याचा एकही मंत्री बोलत नाही; देवेंद्र फडणवीस यांचा सरकारवर हल्लाबोल

एकाच राज्याला संपूर्ण लस देऊ शकत नाही- पंतप्रधान